चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने तात्काळ बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारावीत – सुराज्य अभियान

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने तात्काळ बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारावीत – सुराज्य अभियान Considering the threat of recurring cyclones, the government should immediately set up multi-purpose cyclone prevention centers ,Surajya Abhiyan
      दि.5.6.2021- महाराष्ट्र शासनाने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, पालघर या चार जिल्ह्यांतील एकूण 11 ठिकाणी वर्ष 2019-20 मध्ये ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 42 कोटी 39 लाख रुपयांची तरतूदही केली होती , मात्र ठरलेल्या 18 महिन्यांच्या मुदतीत ही निवारा केंद्र उभारली गेली नाहीत.परिणामी नुकत्याच आलेल्या ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीची प्रचंड हानी झाली आहे. घरे, फळबागा, शेती यांची अतोनात हानी झाली. ठरलेल्या मुदतीत ही बांधकामे झाली असती फना,निसर्ग, तौक्ते अशा एका पाठोपाठ येणार्‍या चक्रीवादळांच्या काळात या निवारा केंद्रांचा मोठा आधार कोकणवासियांना झाला असता. तरी शासनाने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सुराज्य अभियान उपक्रमाच्या माध्यमांतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांनी सदर विषय संबंधित विभागा कडे पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केला आहे.

    राज्याचे महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अदिती तटकरे,अनिल परब,डॉ.उदय सामंत आणि दादाजी भुसे यांनाही या विषयीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, वैश्‍विक हवामान बदलामुळे आणि वारंवार कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आगामी काळात अशी चक्रीवादळे येणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. 

वर्ष 2019-20 मध्ये चार जिल्ह्यांतील काळेथर, आचरा,जामसंडे,विजयदुर्ग,सैतवडे,हर्णे,एडवण, दिघी,दाभोळ,बोर्ली,उसरणी येथे बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला.त्या ठिकाणी ही निवारा केंद्र समय मर्यादा ठेवून तात्काळ उभी करावी. ज्या प्रमाणे चक्रीवादळाच्या पूर्वी मच्छीमारांना पूर्वकल्पना दिली जाते. त्याचप्रमाणे वादळी क्षेत्रातील फळबागायतदार, शेतकरी, व्यावसायिक यांनाही सतर्क करण्यासाठी यंत्रणा उभी करावी. जेणेकरून या वादळापूर्वी पिकांचा उतारा घेऊन या सर्वांची हानीही टाळता येईल.त्यासह चक्री वादळांच्या क्षेत्रांत पीकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने तेथे कोणती पिके घ्यावीत, वादळामुळे होणारी हानी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, तेथील बांधकामे कशा प्रकारची असावी याविषयीही तेथील नागरिकांना मार्गदर्शन करावेे, पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत आलेल्या चक्रीवादळांची पूर्वतयारी म्हणून लक्षावधी नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर केल्याने तेथील संभाव्य जिवीतहानी टळली. त्याच धर्तीवर राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्याही शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: