ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या भावाची दादागिरी; भाजप पदधिकाऱ्याला दांड्याने मारहाण


औरंगाबादः शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचा भावाची दादागरी पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह का केलं म्हणत भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजू भुमरे यांचा मारहाण करतानाचा फोटो सुद्धा समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भुमरे यांच्या मतदारसंघातील धुळे-सोलापूर महामार्गापासून ते साजेगाव ते लिंबगाव रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तर याच बोगस रस्त्याबाबत भाजप तालुका उपाध्यक्ष रणजीत नरवडे आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे हे फेसबुक लाईव्ह करत होते. याबाबत माहिती मिळताच राजू भुमरे आपल्यासोबत काही लोकांना हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. फेसबुक लाईव्ह संपताच भुमरे यांनी नरवडे यांना शिवीगाळ करत हातातील दांड्याने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे नरवडे यांच्या पाठीवर ओळ उमटेपर्यंत मारहाण करण्याचा आल्याचा आरोप नरवडे यांनी केला आहे. तर याप्रकरणी पाचोड पोलिस तक्रार सुद्धा घेत नसल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण

मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या बांधकामात घोटाळे झाले असून, भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने तालुक्यात रस्ते न करता कोट्यवधींचे बोगस बिल काढल्याची तक्रार बद्रीनारायण भुमरे यांनी विभागीय आयुक्तासह जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांनतर माध्यमात बातम्या येताच अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांनतर या कामांची सुरवात झाली आणि त्याचा कामाबाबतच नरवडे फेसबुक लाईव्ह करत होते. ज्यामुळे राजू भुमरे खवळले आणि त्यानीं नरवडे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: