tribute to bipin rawat : बिपीन रावतांच्या निधनाने देश हळहळला; PM मोदींचा भावुक शोक संदेश, म्हणाले…


नवी दिल्ली : देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत निधन झाले आहे. त्यांच्या पत्नीचेहे या घटने निधन झाले. यासोबतच लष्कराच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही निधन झाले आहे. या घटनेने देश हादरला आहे. सूंपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. बिपीन रावत हे देशाचे पहिले सीडीएस होते. त्यांच्या या अपघाती निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली

जनरल बिपीन रावत यांच्या अकाली निधनाने मोठी धक्का बसला आहे. रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचेही अपघातात निधन झाले आहे. अतिशय दुःखद घटना आहे. देशाने एका शूरवीर सुपुत्रा गमवले आहे. रावत यांनी आपल्या ४० वर्षांच्या सेवेत मोठी कामगिरी केली. हा देश त्यांच्या शौर्य आणि पराक्रम कधीच विसरणार नाही. आपल्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

PM मोदींचा संदेश…

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल रावत यांनी मोलाचे काम केले. संरक्षण सुधारणा आणि सैन्य दलांच्या आधुनिकीकरणात त्यांचा मोठा वाटा आहे. लष्करातील सेवेचा समृद्ध अनुभव त्यांनी सोबत आणला. त्यांनी दिलेली सेवा आणि योगदान भारत कधीही विसरणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Breaking: संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन; देशावर मोठा आघात

जनरल बिपीन रावत हे असामान्य सैनिक होते. खरे देशभक्त होते. त्यांनी देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे आणि देशाच्या सुरक्षेतसाठी मोठे योगदान दिले. त्यांचे समारीक आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची भूमिका कौतुकास्पद होती. त्यांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे, असा शोक पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी या संदर्भात ट्विट केले आहे.

helicopter crash : बिपीन रावत यांचे ६ वर्षांपूर्वीही झाले होते हेलिकॉप्टर क्रॅश, थोडक्यात बचावले होते

संपूर्ण देशासाठी आजचा दिवस दुःखाचा आहे. देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाले आहे. मातृभूमिच्या सेवेत आणि सुरक्षेसाठी त्यांनी झोकून काम करणारे ते शूरवीर सैनिकांपैकी ते एक होते. देश सेवेत त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या निधानाने मोठे दुःख झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची श्रद्धांजली

CDS बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने धक्का बसला आहे. रावत यांची पत्नी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. रावत आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या निधनाने देशाचे आणि सैन्य दलांचे मोठे नुकसान झाले आहे. रावत यांनी देशाच्या सुरक्षेसाठी मोठे योगदान दिले आहे. सीडीएस म्हणून रावत यांनी तिन्ही सैन्य दलांमध्ये एक सूत्रता आणण्याचे काम केले. या घटनेत निधन झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना आहेत. जखमी असलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्यावर वेलिंगटनमधील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भारतीय लष्कराची श्रद्धांजली

भारतीय लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: