वीर सेवा दल कोरोना रुग्णसेवा अभियाना मध्ये ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स

वीर सेवा दल, कोरोना रुग्णसेवा अभियानामध्ये
ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स In Veer Seva Dal Corona Rugnaseva Abhiyan Oxygen concentrator machines
  सांगली- दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे फौंडशन बेळगाव,कर्मवीर मल्टीस्टेट संस्था जयसिंगपूर, वीराचार्य पतसंस्था सांगली यांच्या सहयोगातून वीर सेवा दल मध्यवर्ती समिती यांनी कोरोना रुग्णसेवा अभियानासाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स उपलब्ध केले आहेत.कोरोना रिकव्हरी स्टेजला अनेक वेळा घरी आँक्सिजनची गरज असते मात्र अपुर्या आँक्सिजन उपलब्धते मुळे रुग्णांना त्रास होत आहे त्याठिकाणी  ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर उपयोगी पडत आहे.ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रा.डी.ए.पाटील सर यांच्या प्रेरणेतून दिवाणबहाद्दूर लठ्ठे फौंडेशन्स यांनी दिलेले 10 ऑक्सीजन कान्सन्ट्रेटर मशिन्सपैकी कुरुंदवाड येथील कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेत आज 4 गरजू पेशंटसाठी आशिष लठ्ठे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 

    या प्रसंगी डॉ.भरत पाटील,डॉ.संदिप पाटील तसेच वीर सेवा दलाचे कार्यकर्ते अरुण भबिरे, प्रदिप मगदूम, बाळासो टोण्णे, कर्मवीर संस्थेचे संचालक कुमार पाटील, प्र.व्यवस्थापक दादासो किणींगे, वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत धुळा सावंत, शाखाधिकारी संजय चौगुले व स्टाफ उपस्थित होते. या उपक्रमास सुकुमार बेळके सर यांचे मार्गदर्शन लाभले.या ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरच्या उपलब्धततेमुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: