IAF Helicopter Crash CDS: हेलिकॉप्टर क्रॅश कसे झाले? संरक्षण मंत्री उद्या संसदेत निवेदन देणार


नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. आज दुपारी घडलेल्या या घटनेत भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कराच्या इतर ११ अधिकाऱ्यांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. १४ जणांपैकी फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले असून त्यांच्यावर सध्या वेलिंगटन इथल्या लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची म्हणजे (CCS) बैठक झाली. या बैठकीत २ मिनिटांचे मौन राखून हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंतप्रधान मोदींसह या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आता या हेलिकॉप्टर अपघातासंबंधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उद्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन देणार आहेत. मृतांना श्रद्धांजलीही वाहण्यासह ही घटना कशी घडली याची माहिती संरक्षण मंत्र्यांकडून दिली जाण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांचे पार्थिव उद्या संध्याकाळी दिल्लीत आणले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत त्यांना श्रद्धांजली वाहता येईल. त्यानंतर रावत आणि त्यांच्या पत्नीवर दिल्लीतील कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं वृत्त एएनआयने दिलं आहे.
IAF Helicopter Crash हेलिकॉप्टर दुर्घटना: ‘हा’ एकमेव अधिकारी बचावला; शौर्यगाथा आहे थक्क करणारी

दुसरीकडे, सीडीएस बिपीन रावत यांच्या निधन झालेल्या एकूण १३ जणांवर उद्या उत्तराखंडच्या विधानसभेत श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त करण्यात येणार आहे. यानंतर सभागृह संपूर्ण दिवसासाठी तहकूब केले जाईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांनी दिली.

tribute to bipin rawat : बिपीन रावतांच्या निधनाने देश हळहळला; PM मोदींचा भावुक शोक संदेश, म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: