पंढरपूर आगाराची प्रवासी बस सेवा अंशतः सुरू

पंढरपूर आगाराची प्रवासी बस सेवा अंशतः सुरू Passenger bus service to Pandharpur depot partially resumed
 पंढरपूर /नागेश आदापुरे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक दिवसांपासून पंढरपूर आगाराची प्रवासी बस सेवा ही बंद होती.पंढरपूर येथून लांब पल्ल्याच्या गाड्यां सुटत होत्या मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या सध्या बंद आहेत. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे दिनांक०१/०६/ २०२१ रोजी पासून पुन्हा पंढरपूर आगारातून पहिल्या टप्प्यात ठराविक प्रवाशांच्या क्षमतेनुसार कोरोनाबाबतचे शासकीय नियम पाळून सोशल डिस्टन्स राखत व मास्क वापरणे बंधनकारक करून एसटी बस सेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर आगाराचे व्यवस्थापक रत्नाकर लाड यांनी दिली आहे. 

यावेळी पंढरपूर ते स्वारगेट सकाळी आठ वाजता पंढरपूर ते टेंभुर्णी सकाळी आठ वाजता,पंढरपूर ते सोलापूर 9 वाजता नियोजित वेळेत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

 महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्यावतीने एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास व सुरक्षित प्रवास हे ब्रीद वाक्य घेऊन काम करीत असलेल्या एस.टी. ने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करून एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन पंढरपूर आगाराचे प्रमुख सुधीर सुतार यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: