ज्ञानेश्वर बागल यांच्या कुटुंबीयांना प्रणव परिचारक यांची भेट

ज्ञानेश्वर कृष्णा बागल यांच्या कुटुंबीयांना प्रणव परिचारक यांची भेट Pranav Paricharak visits the family of Dnyaneshwar Krishna Bagal
 पंढरपूर - आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे ज्ञानेश्वर कृष्णा बागल यांच्या घरी पहाटे सहाच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे त्यांच्या घराचे तसेच संसार उपयोगी वस्तू व कागदपत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .आधिच कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत असलेल्या बागल कुटुंबाला हा मोठा फटका बसला आहे.  

त्यामुळे युवक नेते प्रणव परिचारक यांनी ज्ञानेश्वर कृष्णा बागल कुटुंबाला भेटून धीर देवून किराणा माल व आर्थिक मदत केली.यावेळी सरपंच ज्योती बागल,संदीप कळसुले,सिद्धनाथ इंगोले,गणपत मोरे आणि तरुण सहकरी मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: