आ.नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम Tree planting program on occasion of MLA Nana Patole’s birthday
पंढरपूर ,प्रतिनिधी - महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिना निमित्त आज पंढरपुरात एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर सूर्यवंशी व सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष शंकर सुरवसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या संकल्पाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी उपस्थितांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष समीर कोळी, पंढरपूर शहर सचिव बाळासाहेब आसबे, सोमनाथ गांगुर्डे,शिवाजी धोत्रे,गणेश थिटे, विठ्ठल भुमकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर शहर युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सागर कदम यांनी केले होते.