जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्मवीरमध्ये वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्मवीरमध्ये वृक्षारोपण Tree planting in Karmaveer college on the occasion of World Environment Day

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये चाफा,ब्रासेना,क्रोटोन,वड,पिंपळ, गुलमोहर,जांभुळ या वृक्षांची लागवड करण्यात आली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी दिली.
वृक्षांमुळे निसर्गाचे संरक्षण होते. निसर्गातील हवा शुद्ध होण्यासाठी,मातीचा पोत सुधारण्यासाठी वृक्षांची लागवड गरजेची असते.झाडे परोपकारी असून निसर्गाचे संतुलन राखण्याचे कार्य झाडांमुळे होते. महाविद्यालय परिसर हा झाडांना वेढलेला आहे. तरीही प्रत्येक वर्षी नव्याने झाडे लावण्याचे काम केले जाते. वृक्षांच्या लागवडीसह वृक्षांचे संगोपनही केले जाते.पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमात सिनिअर महाविद्यालयातील प्राध्यापक सहभागी होते . कोव्हीड १९ चे सर्व शासकीय नियम पाळून हा उपक्रम राबविण्यात आला.