पंढरपूर नगरपरिषद, नागरी हिवताप योजना व आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप प्रतिरोध महिना

पंढरपूर नगरपरिषद,नागरी हिवताप योजना व आरोग्य विभागाच्यावतीने हिवताप प्रतिरोध महिना
Malaria Prevention Month on behalf of Pandharpur Municipal Council, Urban Malaria Scheme and Health Department
 पंढरपूर, ०५/०६/२०२१- पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर, नागरी हिवताप योजना व आरोग्य विभाग यांच्यावतीने हिवताप प्रतिरोध महिना जून 2021 च्या अनुषंगाने पंढरपूर शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम,हिवताप,डेंग्यू ताप,चिकुनगुनिया आजार प्रतिबंधासाठी दैनंदिन स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.

सदर मोहिमेमध्ये सर्व प्रभागात स्वच्छता करणे, गप्पी मासे सोडणे, डासोत्पत्ती ठिकाणावर आळी नाशक फवारणी करणे,कंटेनर सर्वेक्षण,धूर फवारणी करणे,हस्त पत्रिका वाटप,आरोग्यशिक्षण मायकिंग इत्यादी कामे केली जात आहेत .

covid-19 प्रतिबंधासाठी जंतूनाशक फवारणी व नागरिकांना मायकिंगद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून त्याद्वारे आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. सदर मोहिमेचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 12 अ/12 ब मध्ये दि.1 जून 2021रोजी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,जिल्हा हिवताप अधिकारी व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली विसावा मंदिर, इस्बावी येथून आरोग्य सभापती विक्रम शिरसाट यांचे हस्ते करण्यात आला. 

  या मोहिमेमध्ये सभापती आरोग्य समिती नगर परिषद विक्रम शिरसाट,नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत शिंदे ,विशाल मलपे मेंबर व प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक ,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे ,नागेश तोडकर, जीवशास्त्रज्ञ किरण मंजूळ नागरी हिवताप योजना तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी व नागरि हिवताप योजनेतील कर्मचारी यांनी या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली.किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी 813 घरांची तपासणी केली असता त्यामध्ये 40 घरे ही दूषित आढळून आलेेली आहेत. 1211 कंटेनर तपासणीमधून 39 दूषित कंटेनर आढळून आलेली आहेत. या सर्व कंटेनरमध्ये temephos नावााचे द्रावण टाकण्यात आले व डास आळी नष्ट करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्व परिसरात जंतूनाशक फवारणी व डास आळी नाशक फवारणी करण्यात आली. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व पंढरपूर शहरात पाऊस पडत असल्याने साचलेल्या पाण्या मध्ये temephos व bti द्रवणाची व आळी नाशक फवारणी करीत आहोत. या प्रभागात चार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले तसेच या प्रभागात covid-19 साठी हा भाग संवेदनशील असल्याने या भागातील नागरिकांना माहितीद्वारे जनजागृती करण्यात आली व प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाय योजना सुचविण्यात आल्या. या प्रभागात जवळपास अकराशे 21 हस्त पत्रिका वाटप करण्यात आलेल्या आहेत .अशा प्रकारे पंढरपूर शहरातील सर्व प्रभागांमध्ये हिवताप व किटकजन्य रोग नियंत्रणासाठी पावसाळा व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शहर या आजारापासून सुरक्षित राहावे यासाठी या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

       याच अनुषंगाने पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना नगरपरिषद प्रशासन विभाग,न.पा. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,नगराध्यक्षा सौ साधना भोसले यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे की ,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा .आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराभोवताली व गच्चीवर पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या घराभोवती व गच्चीवर अडगळीचे सामान,भंगार या सर्वांची विल्हेवाट लावावी जेणेकरून आपल्याला डासापासून मुक्तता मिळेल . ताप आल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात किंवा  आपल्या जवळच्या दवाखान्यात जाऊन त्वरित औषधोपचार घ्यावा . covid-19 प्रतिबंधासाठी सर्व नागरिकांनी गर्दीत जाण्याचे टाळावे.प्रत्येक वेळेस मास्कचा वापर करावा . वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत व वारंवार हात धुवावेत.सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र थुंकू नये.या गोष्टींचा आपल्या सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करून नगर परिषद पंढरपूर ,आरोग्य विभाग यांना सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

  यावेळी आपल्या हिवताप प्रतिरोध मोहीमेचे घोष वाक्य आहे की-हिवतापाला शून्य करू,माझ्या पासुन सुरुवात करु .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: