नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्या – केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची अधिकृत घोषणा Navi Mumbai International Airport Republican Party supports demand for naming Patil – Union Minister of State Ramdas Athavale
 मुंबई दि. 6 - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाला दिवंगत लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे या ठाणे,रायगड, पालघर मधील स्थानिक भूमीपुत्रांच्या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची आज अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.  

  नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी येत्या दि. 10 जून रोजी भूमीपुत्रांकडून मानवी साखळी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत असे ना. रामदास आठवले यांनी आज मुंबईत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

  माजी आमदार माजी खासदार रायगडचे थोर  भूमिपुत्र नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नवी मुंबई च्या उभारणीत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे.त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा संबंध होता. त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाला पाठिंबा, सहभाग होता. कोकणमध्ये शिक्षण प्रसारात दि.बां.चे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई,रायगड या भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे.दि. बा.पाटील यांचे सामाजिक योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दिले पाहिजे ही स्थानिक भूमीपुत्रांची मागणी योग्य असून त्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: