पंढरपूरात शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांना पंचगंगा जलाभिषेक

पंढरपूरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना पंचगंगा जलाभिषेक Panchganga Jalabhishek to Shivaraya on the occasion of Shivrajyabhishek Day

पंढरपूर / नागेश आदापूरे – पंढरपूरमध्ये ३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शिवरायांना पाच नद्यांच्या पाण्याने व पंचामृताने अभिषेक छत्रपती सेवा संघातर्फे करण्यात आला.

३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना पंचगंगा जलाभिषेक
  याबाबत सविस्तर वृत्त असे की,१२ वर्षांपूर्वी संदिप मांडवे व सागर कदम यांच्या संकल्पनेतून प्रथम शिवराज्याभिषेक साजरा करण्याची व शिवरायांना पंचामृत अभिषेक करण्याची प्रथा सुरु झाली.ती आजतागायत सुरू असून सालाबाद प्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला .

यावर्षीच्या शिवराज्याभिषेकाचे आयोजन सागर शरद कदम यांनी केले होते.प्रथम छ.शिवरायांच्या चौकाची व पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. नंतर शिवरायांच्या पुतळ्याला पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक आणि पंचामृत अभिषेक करण्यात आला.पुतळा श्वेतवस्त्राने पुसुन पुष्पाहार घालून, धुपबत्ती लावून युवकांच्या जयघोषात पुजा करण्यात आली.

यावेळी संदिप मांडवे,सागर कदम,शंकर सुरवसे, शेखर भोसले,गणेश जाधव,ओंकार चव्हाण, विजय मोरे, सोपान देशमुख, राधेश बादले पाटील, संदिप मुटकुळे, सतिश माने, गणेश थिटे, धनराज मोरे, वैजिनाथ जाधव,विश्वास मोरे,माऊली साठे, आकाश माने, प्रविण शिंदे सर,विकी वाघ, सोमनाथ गांगुर्डे, गणेश मलपे, आकाश पवार, एस पी गायकवाड,काका मोलाणे, इम्रान तांबोळी, बशीर शेख,सागर चव्हाण,किरणराज घाडगे, भास्कर जगताप,स्वागत कदम,स्वप्निल गायकवाड, सागर आटकळे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: