जय महाराष्ट्र,जय महाराष्ट्र,निनादती चौघडे ,शिवस्वराज्य दिन साजरा

जय महाराष्ट्र,जय महाराष्ट्र,निनादती चौघडे …
शिवस्वराज्य दिन साजरा Jai Maharashtra, Jai Maharashtra,Ninadati Choughade …
Celebrate Shivswarajya Day
  सोलापूर/शेळवे/संभाजी वाघुले - हिमालयाशी सांगती नाते सह्यगिरीचे कडे, जय महाराष्ट्र... जय महाराष्ट्र निनादती चौघडे... या गीताने मंगलमय झालेल्या वातावरणात शिवस्वराज्य दिन साजरा झाला. 

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सहा जून रोजी राज्याभिषेक झाला. हा दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. रंगभवन येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे आज सकाळी कार्यक्रम झाला. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर त्यांनी शिवशक राजदंड शिवस्वराज्य गुढीचेही पूजन केले.

     यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत,शिक्षणाधिकारी भगवान बाबर,संजय राठोड,वित्त आणि लेखाधिकारी अजय पवार, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे उपस्थित होते.

     कार्यक्रमावेळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या भक्ती कदम, दर्शनी नेवरे, कल्पना तरळीकर आणि श्रुती कुलकर्णी यांनी महाराष्ट्र गीत,राष्ट्रगीत गायन केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर, कल्पना देशपांडे, भानुदास इरशेट्टी,हणमंत मोतीबने,मारुती शहाणे,लंकेश कमळे,अनिल अंकुशराव,दीपा फाटक,सलीम शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: