जैन समाजाची एकता ही काळाची गरज – नगरसेवक अनुप शहा

जैन समाजाची एकता ही काळाची गरज – नगरसेवक अनुप शहा यांचे प्रतिपादन
 पुणे - सकल जैन समाज,नगर रोड वडगाव शेरी, पुणे येथे जैन समाजातील युवकांच्यावतीने आयोजित निषेध सभेमध्ये बोलताना फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा म्हणाले की,  जैन समाजाला एकीची अत्यंत गरज असून भविष्यामध्ये जर समाजामध्ये एकी राहिली नाही तर समाजाचे मोठे नुकसान होणार आहे . बराच काळापासून अनूप मंडलकडून दिशाभूल करणार्‍या पोस्टद्वारे जैन समाजाविरूद्ध चुकीची माहिती पसरवली जात आहे. अलीकडेच ही अफवा या मंडळाच्यावतीने पसरली गेली आहे की जैन मुनींनी कोरोना पसरविला आहे. संताच्या वतीने प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांचे पोस्टर्स जाळून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला सुरूंग लावण्यात येत आहे .  

पुढे बोलताना नगरसेवक अनुप शहा म्हणाले की,त्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन मंडळाचे प्रमुख मुकनाराम यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, बुक वर्ल्ड यासारख्या अनुप मंडळाने केलेल्या सामाजिक उपक्रमांवर दिशाभूल करणार्‍या प्रचार साहित्यावर बंदी घातली जावी. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यानंतर दोषी अनूप मंडलवर कारवाई करायला हवी.नाहीतर या विरोधात जैन समाजाच्यावतीने कारवाई करण्या साठी शासनाला भाग पाडले जाईल.कारण जैन समाज हा शांतताप्रिय आहे.ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सर्व संस्कृती आणि समाजात मिसळून राहणारा आहे.

या बैठकीमध्ये राजस्थान व गुजरात येथे कार्यरत असलेल्या अनुप मंडलचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक मुळुख व्यासपीठावर उपस्थित होते समाजाच्या बैठकीचे आयोजन गौरव कोठारी स्वप्नील बोरा राहुल शहा संतोष पगारिया अनिल डार्कलिया भावेश जैन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: