पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार Will discuss reservation in promotion with Chief Minister Uddhav Thackeray – Deputy Chief Minister Ajit Pawar
पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रिपाइं युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेट
मुंबई दि.8 - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व मागास वर्गीय आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांची आज पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्रालय येथे भेट घेतली.
शासकीय नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षण त्वरित लागू करा असे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात उपसमितीमधील सदस्यांसोबत बैठका होऊन कायदेशीर सल्ला मागविण्यात आला आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे शिष्ट मंडळाला आश्वासन दिले.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपाइं तर्फे दि.1 जून ते 7 जून राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला.त्यानुसार रिपाइंचे युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा देऊन तशी तयारी केली होती. त्याची बातमी पोलिसांना लागल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत आंदोलक नेते रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील रिपाइंच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट मंत्रालय येथे घडवून दिली.या भेटीत झालेल्या चर्चेत पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणारा शासन निर्णय राज्य सरकारने काढल्यामुळे मागासवर्गीयां वर अन्याय झाल्याचे सांगत ह निर्णय त्वरित रद्द करून पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावी अशी मागणी रमेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी रिपाइंच्या शिष्टमंडळात सचिन आठवले ,अभिजित गायकवाड,विशाल गाडे,सुरेश कदम आदी उपस्थित होते.
Like this:
Like Loading...