कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर ठरतेय गोर गरीब रुग्णांसाठी वरदान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर ठरतेय गोर गरीब रुग्णांसाठी वरदान Even in the second wave of Corona, Pandharpur Sub-District Hospital is a boon for the very poor patients
शेकडो रुग्णांनी यशस्वी उपचारानंतर केली कोविड १९ आजारावर मात
  पंढरपूर /नागेश आदापूरे,दि .०७/०६/२०२१ - कोरोना महामारीच्या काळात येथील उपजिल्हा रुग्णालय हे पंढरपूर व आजुबाजुच्या परिसरातील गोर गरीब रुग्णांकरीता आधार केंद्र ठरले असून आजतागायत या रुग्णालयात सुमारे १४०० हून अधिक गोर गरीब रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले व पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर हे गेल्या एक वर्षापासुन कोविड रुग्णांना सेवा देत असून आजतागायत या ठिकाणी सुमारे १४०० हून जास्त कोरोना रुग्णांना उपचारासाठी संदर्भित करण्यात येवून उपचार करण्यात आले.कोविड रुग्णांना योग्य उपचार देण्याकरीता रुग्णालयाचे फिजीशिअन डॉ.सचिन वाळुजकर,डॉ शिवकमल व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड वॉर्डात काम करणारे सर्व वैद्यकिय अधिकारी,अधिपरिचारीका पॅरामेडीकल कर्मचारी व इतर कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली . यामुळेच रुग्णसेवा देत असताना अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविता आली अशी समाधानाची भावना रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी व्यक्त केली . 

   उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर या ठिकाणी आजतागायत एकुण ७९९० जणांची कोविड आरटीपीसीआर तपासणी व १६००० हून जास्त संशयीत रुग्णांची रॅपीड अँन्टीजेन तपासणी करण्यात आलेली आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याला बसला आहे.जिल्हयातील सर्वाधिक रुग्ण या दोन तालुक्यात आढळून आले असून अनेक रुग्णांचा केवळ उपचार अभावी मृत्यु होत असल्याचे लक्षात घेवून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी ५० खाटांचे कोविड रुग्णालय असताना देखील उपजिल्हा रुग्णालय ,पंढरपूर येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अपुरे मनुष्यबळ , ऑक्सीजनची कमतरता तसेच येथील अनेक वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी पॉजीटीव्ह असताना देखील रुग्णांचे जीव वाचविण्याकरीता केवळ ५० खाटांची क्षमता असूनही सुमारे १०० ते १२० रुग्ण दाखल करुन घेवून त्यांच्यावर योग्य उपचार केले.यामध्ये ऑक्सिजनची बचत करण्या साठी येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांच्या नॉन रिब्रीदींग मास्क पॅटर्न चे राज्यभरात सर्व स्तरातुन कौतुक करण्यात आले . कोविड रुग्णांच्या उपचाराबरोबरच या ठिकाणी नॉन कोव्हिड सेवाही अविरतपणे चालु आहे हे विशेष .

    राज्याच्या आरोग्य संचालिका श्रीमती अर्चना पाटील यांनी या सर्व कामकाजाची दखल घेत , उपजिल्हा रुग्णालय पंढरपुरला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व वैद्यकिय अधिकारी ,अधिपरिचारीका व इतर कर्मचारी यांचे विशेष कौतुक करुन सर्वांचे अभिनंदन केले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले,उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांचे उपजिल्हा रुग्णालयाला वेळोवेळी मार्गदर्शन व बहुमोल सहकार्य लाभत असल्याचेही डॉ.अरविंद गिराम यांनी यावेळी नमुद केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: