कुर्डुवाडीत १८ ते ४४ वयोगटातील कोरोना लसीचा दुसरा डोस देणे सुरु

कुर्डुवाडीत १८ ते ४४ वयोगटातील कोरोना लसीचा दुसरा डोस देणे सुरु Second dose of Corona vaccine for 18 to 44 year olds started in Kurduwadi
 कुर्डूवाडी/ राहुल धोका - कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ या वयोगटातील कोव्ह्क्सीन चा दुसरा डोस देणे आज सुरु झाले असून यासाठी ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षका डॉ.सुनंदा रणदिवे यांनी पाठपुरावा केला होता. एकूण ७२३ लाभार्तीना दि ८ ते ११ पर्यंत लस देण्यात येणार आहे. 

   कुर्डुवाडी येथे सम्यक राहुल धोका (वय १८) पुर्ण असलेला व दोन्ही लस पुर्ण करणारा पहिला १८ ते ४४ या वयोगटातील तरुण ठरला आहे. दि ८ मे २०२१  रोजी पहिली लस व नंतर ८ जुन २०२१  रोजी सकाळी दुसरा डोस घेतला. त्यावेळी दुसरी कोरोना लस घेतल्यानंतर हात दाखवत लस सुरक्षित असल्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचारी व सिस्टर यांनी त्याचे अभिनंदन केले.

  गेल्या महिन्यात याच तारखेला लस देण्यात आली होती. त्याचप्रमाणे क्रमवार त्याच तारखेला या महिन्यात दुसरा डोस दिला जात असून त्या मुळे रुग्णालयात गर्दी होती. 

      लस घेण्यासाठी पूर्वी मोबाईलवर आलेला रेफ्ररन्स कोड किंवा पहिल्या लसीचे प्रमाणपत्र गरजेचे आहे ,अशी माहिती डॉ.प्रसन्न शहा यांनी दिली.लसीकरण केंद्रात सुनिता ग्राम,मनीषा ढाकणे,शिवगंगा पाखरे,गणेश कवडे,समोपदेशक कमर तांबोळी हे कर्मचारी लसीकरणात मदत करत होते. डॉ.पंकज सातव येणाऱ्या नागरिकांची मदत करत होते. ग्रामीण रुग्णालयात स्टाफची कमतरता असतानाही योग्य नियोजन करून लस दिली जात होती. या वेळेस पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: