माय नेम इज टुडे … चावडीवरील पंचनामा
माय नेम इज टुडे …….
आम्ही राज्यकर्ते
सांगतो वारसा शिवरायांचा ,
मात्र झालोत मांडलिक दिल्ली दरबारा ‘
करतोत पंचनामा
आम्ही आमुच्याच अब्रूचा ,
गातोत पोवाडे निलाजरेपणे
श्रेष्ठींच्या कौतुकाचे
बोलतो सतत खोटे व्यवहारही खोटे
येथे गर्दी फक्त लबाड लांडग्याची ,
सारे भोन्दू स्वामी सज्ज ,
यांच्याच पाप क्षालना !
गाती पोवाडे शिवरायाचे
परी लाजवती औरंगजेबा !
सारे फंदफितुर
येथे दरबार चोरांचा
यांच्या मुखात एक अन मनांत वेगळे
सारेच एकाच खाणीतील दगड
कोण कोणास विचारतो
जो तो खुर्चीलाच पूजतो
स्वाभिमान गहाण ठेवतो
श्रेष्ठींचा दास होण्यातच धन्यता मानतो”!!
चावडीवरील पंचनामा:
खुर्चीवर बसताच जो तो शहाणा होतो ,
उपदेशाचे डोस पाजतो
संधी मिळताच आपले खिसे भरतो
वरून गीता सांगतो !!
आनंद कोठडिया ,जेऊर , ता.करमाळा ०९४०४६९२२००
