राज्यभरात पोलिसां साठी २ लाख हक्काची घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

राज्यभरात पोलिसांसाठी २ लाख हक्काची घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे Aim to build 2 lakh houses for police in state -Urban Development Minister Eknath Shinde
गृह आणि गृहनिर्माण विभागाच्या समन्वयाने लवकरच धोरण अंतिम
 मुंबई,दि.१० - पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठी वणवण थांबावी, यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

    पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत असून गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले जाईल, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.

 या संदर्भात गुरुवारी श्री.शिंदे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.

   सद्यस्थितीत राज्यातील दीड लाख पोलिस हक्काच्या घरापासून वंचित आहेत. त्यांना घरं मिळवून द्यायची असल्यास तेवढ्या मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठीच शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्म अशा तीन टप्प्यात या धोरणाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांना सेवा बजावताना लागणारी सेवा निवासस्थाने आणि निवृत्तीनंतर लागणारी मालकी हक्काची निवासस्थाने अशी दुहेरी गरज लक्षात घेऊनच या योजनेचे अंतिम स्वरूप तयार करण्यात येणार आहे.

   पोलिसांसाठी घरे निर्माण करण्याचे अनेक पर्याय या बैठकीत समोर आले असून गृह विभाग व गृहनिर्माण विभागाच्या समन्वयाने या धोरणाला अंतिम रूप दिले जाईल.शासनाला मिळत असलेला हाऊसिंग स्टॉक आणि इतर योजनांमधून उपलब्ध होणारी घरे वगळता अजून घरे पोलिसांना कशी उपलब्ध करून देता येतील, याला सरकारचे प्राधान्य असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

   या बैठकीस गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायम स्वरूपीमार्गी लागावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु असूनही त्यात आश्वासनांशिवाय हाती काहीच लागत नसल्याने ज्यावेळी प्रत्यक्ष या निर्णयाची अंमलबजावणी होईल त्यावेळी पोलिसांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: