पंढरपूरात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न

पंढरपूरात राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न In Pandharpur,the 22nd anniversary of NCP was celebrated with various programs
 पंढरपूर / प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन पंढरपूर शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उत्साहात संपंन्न झाला.

या वर्धापन दिना निमित्त जिजामाता उद्यान येथे सकाळी १० वा.१० मिनिटांनी पक्षाचा ध्वजारोहण जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

   यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना वर्धापनदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या.पुढे बोलताना ते  म्हणाले की,पुढील काळात खा.शरद पवार साहेबांचे विचाराने पक्षाची ध्येय धोरणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांना बरोबर घेवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू .

    या ध्वजारोहण सोहळ्यात समाधान काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.गणेश पाटील हे प्रमुख उपस्थित होते तर न.पा.विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे यांचे अध्यक्षतेखाली पार हा सोहळा पार पडला.याप्रसंगी तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख,शहराध्यक्ष सुधीर भोसले, जि.प.सदस्य अतुल खरात,राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.मारुती जाधव, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष रणजित पाटील,संजय बंदपट्टे,माजी नगरसेवक महंमद उस्ताद,किरण घाडगे,सुधीर धुमाळ,सुरज पावले, संजय भिंगे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष स्वप्निल जगताप, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, युवकचे जिल्हा सरचिटणिस सुरज पेंडाल, सागर पडगळ,सुभाष बागल,फाटे,उपाध्यक्ष गिरिष चाकोते,सचिन कदम,सचिन आदमिले, विजय काळे,आण्णासाहेब पोफळे,कपिल कदम, सुनिल जाधव,रशिद शेख,प्रा.विजय गायकवाड, गणेश साळुंखे,मनोज आदलिंगे,राकेश साळुंखे, ओंकार जगताप,शुभम साळुंखे, काँग्रेसचे शंकर सुरवसे, सागर कदम व त्यांचे सहकारी , राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सुवर्णाताई बागल,युवती जिल्हाध्यक्षा श्रेयाताई भोसले, तालुकाध्यक्षा अनिताताई पवार,ओबीसी सेल महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साधनाताई राऊत, शहराध्यक्षा संगिताताई माने,कार्याध्यक्षा रंजनाताई हजारे, शुभांगीताई जाधव यांचेसह युवती तालुका कार्याध्यक्षा सारिका गायकवाड व युवती तालुका उपाध्यक्षा ऋतुजा चव्हाण तसेच पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महिला व युवती व विद्यार्थी आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: