महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रश्नांवर पंतप्रधानांची भेट घ्यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट Leader of Opposition Devendra Fadnavis called on Union Minister of State Ramdas Athawale

मुंबई दि.10 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले Ramdas Athawale यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण , पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि तोक्ते चक्रीवादळ ग्रस्तांना मदत या राज्यातील प्रमुख प्रश्नांवर महायुतीचे प्रमुख नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली.

त्यावर आपण लवकरच पंतप्रधानांची वेळ घेऊन महायुतीच्या वतीने महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ असे सांगत महायुतीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी ना.रामदास आठवले यांच्या सूचनेचा स्वीकार केला.

   यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, माजी आमदार सुमंतराव गायकवाड उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: