प्रहार धरणग्रस्त संघटना सोलापूर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

प्रहार धरणग्रस्त संघटना सोलापूर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक संपन्न Meeting of Solapur District prahar dharangrast sanghatna Activists

पंढरपूर, 13/06/2021/नागेश आदापूरे – आज मौजे आजोती तालुका पंढरपूर येथे प्रहार धरणग्रस्त संघटना सोलापूर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी प्रहार पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख शंभूराजे खलाटे, दत्ता भाऊ व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना संजय जगताप, जिल्हा सचिव प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .

   यावेळी उपस्थित सर्व धरणग्रस्त कार्यकर्त्यांनी रणजीत व्यंकटराव जगताप यांची सर्वानुमते सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. याप्रसंगी प्रहारचे दत्ता जमदाडे,दत्ता चौगुले, गणेश ननवरे, रमेश आव्हाड, राजेंद्र आरकिले, सज्जन आरकिले, तात्या पानसरे, तात्या जगन्नाथ देशमुख ,बाबा सलगर, संतोष सलगर, प्रकाश बोंगाणे, अमोल देवकर, भाऊ खरात, राजेंद्र चोरमले, पोपट लोखंडे, पंकज कनेरकर,गुरूदास गुटाळ ,विनायक झेंडे, विजय उंबरकर, डॉक्टर नवनाथ देडगे, बालाजी शिंदे ,भास्कर सौंदणे, बाळासाहेब बोबडे, नागनाथ देडगे, शिवसेना अध्यक्ष विजय आरकिले, सचिन देडगे सरपंच, शहाजी बंडगर ,खपाले सर,  बिभीषण गुटाळ, किरण काळे, सतीश पाडुळे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: