माझी बारामती …. गोफणगुंडा
माझी बारामती ….

जेंव्हा जेंव्हा खुंटते मती
तेंव्हा तेंव्हाच आठवते बारामती!
जो जरुरीचा तोच सोयीचा
नाद बारामतीचा खुळा
लागतो सत्तेसाठी सर्वानाच लळा!!
जेंव्हा जेंव्हा बैठका
तेंव्हा तेंव्हा मिळे कोणास
हाताला हात गळ्याला गळा
सुरात सूर तर कोणास राजकीय चटका
तर कोणास मिळे फटका
कोणाची होते चांदी,कोणा लाभे मंदी
ना विधिनिषेध कोणा
विचार फक्त बेरजेचा!!
जेंव्हा जेंव्हा सत्तांतराचा डाव
तेंव्हा तेंव्हा फक्त बारामतीचाच अखेरचा घाव!!
कोणीही असो घरचा वा परका
सत्तेसाठी ना दया ना माया
जाईल तिथे फक्त बारामतीचीच छाया!!
सत्तेसाठी ना भेदभाव तत्वांचा पक्षाचा
जो पदरात पडतो तोच पवित्र ठरतो
जो आपल्या दावणीला
तोच चालतो सोबतीला
नियम पक्का राजकारणाला!!
अशी ही बारामतीची हवा
सत्तेसाठी येथे सदैव तापलेला असतो तवा
मनांत काय कळतं नाय
ठरवलेलं केल्याबगार रहात नाय “!!
आंनद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००
