राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या ई-मेल प्रणाली वर सायबर उल्लंघन होत नसल्याचे केले सरकारने स्पष्ट

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) ई-मेल प्रणालीवर सायबर उल्लंघन होत नसल्याचे सरकारने केले स्पष्ट government has clarified that there is no cyber violation on e-mail system of the National Informatics Center (NIC)
 नवी दिल्‍ली,13 जून 2021,PIB Mumbai-

एअर इंडिया,बिग बास्केट आणि डोमिनोज या सारख्या संस्थांमधील डेटा उल्लंघनाच्या परिणामा संदर्भात काही प्रसारमाध्यमांवर असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे की,ज्यायोगे उल्लंघन करणाऱ्यांनी हॅकर्सना एनआयसीचे ईमेल खाती व सांकेतिक शब्द कळवले आहेत.

हे लक्षात घेता,प्रथम हे स्पष्ट करणे महत्वाचे आहे की, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) देखभाल केलेल्या भारत सरकारच्या ई-मेल सिस्टममध्ये सायबर माहितीचे उल्लंघन झालेले नाही. ई-मेल प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहे.

दुसरे म्हणजे,जर शासकीय वापरकर्त्यांनी त्यांच्या शासकीय ई-मेल खात्याचा वापर करुन या पोर्टल वर नोंदणी केली नसेल आणि शासकीय ई-मेल खात्यात वापरलेल्या संकेतशब्दाचा वापर केला नसेल तर बाह्य पोर्टलवरील सायबर सुरक्षा उल्लंघनाचा परिणाम सरकारी ई-मेल सेवेच्या वापरकर्त्यांवर होणार नाही.

एनआयसी ई-मेल सिस्टमने आपल्या व्यवस्थेत  द्विस्तरीय  प्रमाणीकरण आणि 90 दिवसांत संकेत शब्द बदलणे यासारखे अनेक सुरक्षा उपाय ठेवले आहेत.  याव्यतिरिक्त एनआयसी ई-मेलमधील संकेतशब्द बदलण्यासाठी मोबाइल ओटीपी आवश्यक आहे आणि जर मोबाइल ओटीपी चुकीचा असेल तर संकेतशब्द बदलणे शक्य होणार नाही. एनआयसी ई-मेल वापरुन फिशिंग करण्याचा कोणताही प्रयत्न एनआयसीद्वारे रद्द केला जाऊ शकतो,याशिवाय एनआयसी वेळोवेळी वापरकर्ता जागरूकता मोहीमादेखील आयोजित करते आणि संभाव्य जोखीम आणि सुरक्षितता मापदंडांसंदर्भात वापरकर्त्यांना अद्ययावत करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: