पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न
पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न State level award ceremony of Patrakar surakhsha samittee held
तुळजापूर ,(प्रतिनिधी) - पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी , प्रश्नावर नेहमीच पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने आंदोलन,उपोषण व राज्यसरकार कडे पाठपुरावा करत असून समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व प्रसिद्धी माध्यमापासून दूर असलेल्या विविध व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. यंदाचे हे पाचवे वर्ष असून पत्रकारितेबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
इटकळ तालुका तुळजापूर येथील मोनिका पोल्ट्री फॉर्म हाऊसमध्ये पुरस्कार सोहळा संपन्न झाला. महादेव सोनटक्के - कृषीभूषण,
यशवंत पाटील – आदर्श वकील,दिनेश सलगरे – आदर्श पत्रकार,सतीश गडकरी – आदर्श साहित्यिक यांना सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, शाल पुष्पहार घालून व फेटा बांधून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री मोटे,पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे,राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार सोहळा कार्यक्रमात अरविंद पाटील पिंजरावाडीचे सरपंच गणपत राठोड खानापूरचे सदस्य बंडू धुते इटकळ येथील राहुल बागडे , फिरोज मुजावर,आबा पाटील,साहेब क्षीरसागर , श्रीकृष्ण मुळे, हुसेन मकानदार, काशिनाथ लकडे यांचाही फेटा बांधून व शाल पांघरून सत्कार करण्यात आला.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे नियोजन पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे यांनी केले होते.या कार्यक्रमा साठी पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहराध्यक्ष वैजिनाथ बिराजदार, कार्याध्यक्ष अन्सार बी एस तांबोळी,सचिव अभिषेक चिलका,राजाभाऊ पवार, इस्माईल शेख, बाबा काशीद रमेश अपराध आदी उपस्थित होते.