मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम Various programs on the occasion of the birthday of Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray
पंढरपूर 14/06/2021 - आज 14 जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे व तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आयटीआय कॉलेज, पंढरपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गरजूंना अन्नदान करण्यात आले. बारा वाजता मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथील वृद्ध मातापित्याना मिष्टान्न भोजन तसेच साडी चोळी, शर्ट विजार, धोतर इत्यादीचे वाटप मनसे प्रदेश सरचिटणीस, शँडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पंढरपूर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ,उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार, शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष गणेश पिंपळणेरकर,तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, विदयार्थी सेना अध्यक्ष प्रताप भोसले,स्वप्निल जाधव,तेजस गांजाले,सिद्धनाथ गायकवाड, धनाजी चव्हाण,हेमंत पवार,ओंकार गुरव,लखन घाडगे, विक्रांत तिखुटे,नागेश इंगोले,सज्जन मस्के, मारुती एवळे,शिवाजी राऊत,तेजस भोसले, आदर्श गुरव, ऋषिकेष गुरव,प्रथमेश पवार आदींसह सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक तसेच आयटीआय कॉलेज, पंढरपूरचे श्री.पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: