राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपुरात साकारणार भव्य रांगोळी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपुरात साकारणार भव्य रांगोळी ,रांगोळीतून करणार कृतज्ञता व्यक्त Rangoli to be celebrated in Pandharpur on the occasion of 22nd Anniversary of NCP, to express gratitude through Rangoli
  पंढरपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार sharad Pawar यांनी 22 वर्षापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रादेशिक पक्षाची स्थापना करून एक रोपटे लावले होते त्याचा आता एक मोठा वटवृक्ष झाला असून नुकताच राष्ट्रवादीचा 22 वा वर्धापन दिन कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil ,उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी सूचना केल्याप्रमाणे हा वर्धापन दिन दि.10 जून ते 20 जून असा माणूसकीच्या नात्याने आरोग्य दिंडी सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने ही महाभव्यदिव्य रांगोळी साकारून यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज पर्यंत व कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन व सफाई कामगार यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पंढरपूर शहरात प्रथमच 45 बाय 25 अशी मोठी रांगोळी साकारण्यात येणार असून त्यामध्ये पंढरपूरचे आराध्यदैवत श्री विठुराया तसेच वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व सफाई कामगार, खा.शरद पवार , आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी दिंडी यांच्या चित्रांचा रांगोळीमध्ये समावेश असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.

 महाराष्ट्राच्या विकासामध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे.या कोरोनाच्या काळातही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपआपल्या परीने जनतेच्या मदतीसाठी धावून जात आहेत व पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे लोक माझा सांगाती या प्रशासकीय कामकाजाचे अनेक पैलू असलेले पुस्तक पवार साहेबांनी केलेल्या कार्याची ओळख प्रशासकीय अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी प्रशासकीय अधिकारी यांना हे पुस्तक भेट दिले आहे.

  या रांगोळीचे उद्‌घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दि.18 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमा साठी शहर उपाध्यक्ष दादा थिटे, संतोष बंडगर, सुरज पेंडाल, आकाश नेहतराव,तानाजी मोरे, निलेश कोरके, सारंग महामुनी,सुरज कांबळे आदि परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: