मनसेच्या रक्तदान शिबिरात १०३ जणांचे रक्तदान

मनसेच्या रक्तदान शिबिरात १०३ जणांचे रक्तदान
Blood donation of 103 people in MNS blood donation camp

कुर्डूवाडी/ राहुल धोका,14/06/2021- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे Raj Thakare यांचा वाढदिवस तसेच जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या रक्तदान शिबिरात १०३ जणांनी रक्तदान केले .कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाची गरज ओळखून घेतलेल्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

माढा तालुका मनसेच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टोणपे,तालुकाध्यक्ष सागर लोकरे यांनी केले होते .

 या शिबिराचेवेळी आकाश लांडे,नागेश अमित, क्षीरसागर ,दिनेश वनवे,संदीप गाडे इंगोले,पांडुरंग ढेरे,उमेश माने,राहुल सुर्वे,उपसरपंच दाजी शिंदे ,सागर बंदपट्टे,गणेश चौधरी,ओंकार चौधरी, युवराज कोळी,सोमनाथ पवार,अमोल घोडके आदि पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: