काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आवाहन Congress should insist on the post of Chief Minister or else withdraw support – Union Minister of State Ramdas Athawale

मुंबई दि.14 – फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे.जर काँग्रेस ला मुख्यमंत्रीपद दिले जात नसेल तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.

 नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल तसेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची इच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे.त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्रीपद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्रीपद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढला  पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: