महिलांविरुद्ध होत असलेल्या गुन्ह्यांबाबत त्वरित कारवाई करा- डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

ठाणे ,पालघरमध्ये महिलांविरुद्ध होत असलेल्या गुन्ह्यांबाबत त्वरित कारवाई करण्याच्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कोकण विशेष पोलीस महानिरीक्षक यांना सूचना Dr.Neelam Gorhe’s instructions to take immediate action against crimes against women
 दि.१४ जून २०२१, मुंबई/ठाणे/पालघर - रेल्वे स्टेशन कळवा येथे कै.विद्या पाटील या मोबाईल चोराचा प्रतिकार करत असताना मृत्युमुखी पडल्या होत्या तसेच रिक्षामधून कन्मीला रायसिंग या रिक्षाने जात असताना त्यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. या झटापटीत खाली पडून डोक्यास मार लागून त्यांचा मृत्यू झाला तसेच वाडा येथील सुप्रिया गुरुनाथ काळे यांच्या घरी दि.११ जून २०२१ या रोजी एका इसमाचा चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी खून केला. या तिन्ही घटनांच्या अनुषंगाने महिलांविरुद्ध गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आढळून येत असल्याने याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या घटनेबद्दल आपल्या पत्राद्वारे कोकण विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांना 

त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पत्रात डॅा.गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

◆कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस विभागांना सतर्क करण्यात यावे.
◆महिलांविरुद्ध च्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेण्यात यावी. ◆ज्यांचे वर गुन्हे दाखल आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, जामीन मिळू नये यासाठी न्यायालयात सरकारी वकिलांच्या माध्यमातून प्रभावी मांडणी करावी.
◆गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करावी तसेच १४९ व १०७ अंतर्गत गुन्हा प्रतिबंध होण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना सूचित करून उचित कार्यवाही करावी असेही विशेष पोलीस महानिरीक्षकांना सूचना डॅा.नीलम गोऱ्हे यांनी या घटनेसंदर्भात पत्राद्वारे सूचित केले आहे.

अशा प्रकरणात तातडीने कारवाई करत फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस चालून गुन्हेगारांना कडक शिक्षा सुनावण्यात आली तरच या गुन्हेगारीवर काही प्रमाणात वचक बसणार आहे.समाजात कोण गुन्हा करेल हेही सांगणे कठिण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: