प्रा.प्रवीण उघडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पी.एच.डी.पदवी प्रदान

प्रा.प्रवीण उघडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएच.डी.पदवी प्रदान Prof. Praveen Ughade awarded Ph.D degree from Punyashlok Ahilya Devi Holkar University
पंढरपूर – मौजे तिसंगी येथील प्रा.प्रवीण उघडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने भूगोल विषयाची पी.एच.डी पदवी प्रदान केली आहे. पीएच.डी.पदवीसाठी प्रा.उघडे यांनी सांगोला महाविद्यालयातील भूगोल संशोधन केंद्रप्रमुख प्रो.डॉ.भीमराव फुले यांच्या मार्गदर्शना खाली ‘पब्लिक हेल्थ केअर सेंटर्स इन कोल्हापूर डीस्ट्रीक्ट ऑफ महाराष्ट्रा ए जॉग्राफिकल स्टडी’ (कोल्हापूर जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य केंद्राचा भौगोलिक अभ्यास) हा संशोधन प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. 

 प्रा.उघडे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव गायकवाड, संस्था सचिव प्राचार्य महादेव झिरपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुसूदन बचुटे,शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख डॉ.संभाजी शिंदे,भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो.डॉ.तानाजी लोखंडे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.संतोष कांबळे व कार्यालयीन प्रमुख प्रकाश शिंदे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: