चंदनउटी पुजा समाप्ती नंतर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

चंदनउटी पुजा समाप्तीनंतर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट Attractive floral decoration in the temple after the completion of Chandanuti Puja
पंढरपूर /नागेश आदापुरे - श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस मंदिर समितीतर्फे उन्हाळ्यामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे चैत्र शुद्ध 1 ते मृगनक्षत्रपर्यंत दुपारच्या पोषाखानंतर चार ते पाच यावेळेत चंदन उटी करण्यात येते. त्यानुसार श्री चंदन उटी पूजेस सुरुवात चैत्र शुद्ध एक दिनांक 13/0 4 /2021 पासून करण्यात आली होती. आज ज्येष्ठ शुद्ध 3 रविवार13/06/2021 रोजी श्रींना सुरू असलेल्या चंदन उटी पूजेची समाप्ती करण्यात आली.

त्यानुसार आज दुपारी श्रींचा पोषाख झाल्यानंतर मंदिर समितीचे पुजारी सचिन देशपांडे, रुक्मिणी मातेचे पुजारी महेश जितींकर यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. श्री चंदन उटी पूजा गतीवर्षाप्रमाणेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकभक्तांच्या मार्फत न करता मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली.

चंदनउटी पुजा समाप्तीनंतर श्री विठ्ठलाचा गाभारा व श्री रुक्मिणी मातेचा गाभारा फुलांनी आकर्षित सजावट करण्यात आला होता. सदर सजावट पुणे येथील श्री विठ्ठलाचे भक्त राम जांभूळकर यांनी केली होती. ही सजावट करण्यासाठी झेंडू,मोगरा, गुलछडी, गुलाब,शेवंती,तगार या फुलांचा वापर करण्यात आला होता. कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून हे विधी करण्यात आले अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: