राज्यात अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फिड् संदर्भात तक्रारी

राज्यात अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीफिड् संदर्भात तक्रारी Complaints regarding poultry feed of farmers from several places in the state

पंढरपूर – गेले काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणाहून अनेक शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीफिड् संदर्भात तक्रारी येत आहेत , निकृष्ट दर्जाचे फिड्स मिळाल्याने अनेक पोल्ट्रीफार्मधारकांचे लाखोंचे नुकसान होत आहे . पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी तर झापा या कंपनी विरोधात अनेक पोल्ट्रीफार्म चालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केल्या आहेत .झापा सोबतच बारामती अँग्रो या कंपनीचे फीड देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे एका शेतकऱ्याने व्हिडीओच्या माध्यमातुन समस्या मांडली आहे .

अनेक शेतकरी या नामवंत फिड्स कंपन्यांचे पशुखाद्य दिर्घकाळा पासून वापरत आहेत. फीड्स बाबत कधीही प्राब्लेम झालेला नव्हता .परंतु गेल्या महिन्यात कंपनीच्या फीड्समुळे अचानक कोंबड्यांनी अंडी देण बंद केलं आहे असं या शेतकर्यांचं मत येत आहे.या फिड्समुळे उत्पादन क्षमता कमी झाली आहे अशीही त्यांची तक्रार आहे .या संदर्भात या नामवंत कंपन्यांचे व्यवस्थापन देखील या शेतकर्याच्या समस्येबाबत दखल घेत नाही व उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत ,असे मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना पोल्ट्रीफार्म चालवणे त्यांना खाद्य देणे आदि रोजचा खर्च परवडत नाही आणि कंपनी देखील हात झटकत आहेत त्याची आपण शासनामार्फत चौकशी करून शहानिशा करावी . घडलेल्या या प्रकाराबाबत पशुसंवर्धन विभागाने देखील कडक पावले उचलावीत. जेणेकरून यामुळे या पोल्ट्रीफार्मधारक शेतकर्यांना दिलासा मिळेल,अशी मागणी रणजित बागल , प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी यांनी एका पत्रकाद्वारे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याकडे केली आहे. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: