business

अहिंसा पतसंस्था ही सर्वसामान्यांची संस्था असून चांगले कर्जदार ही संस्थेची संपत्ती आहेत – नितीन दोशी

अहिंसा पतसंस्थेकडून महिंद्रा कंपनीच्या जितो या चार चाकी वाहनांचे वितरण

म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 29- म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थेने स्थापनेपासून आपला ऑडिट वर्ग अ जपला असून गरजू कर्जदारांना कर्ज देणे व त्याची नियमितपणे परतफेड करून घेणे हे जणू संस्थेचे ब्रीद बनले आहे.सहकारातून सेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे सर्व सामान्य लोकांना कर्ज स्वरूपात मदत करणे हे अहिंसा पतसंस्थेने गरजू लोकांसाठी उभारलेले एक भांडारच आहे अशी प्रतिक्रिया महादेव कवडे यांनी व्यक्त केली.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी म्हणाले की अहिंसा पतसंस्था ही सर्वसामान्यांची संस्था असून चांगले कर्जदार ही संस्थेची संपत्ती आहेत. त्यांनी वेळेवर कर्ज फेडल्यामुळेच संस्थेची भरभराट होत असते.

या वाहन वितरणावेळी जेष्ठ पत्रकार एल के सरतापे, संस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ, उपव्यवस्थापक आहेरकर तसेच संस्थेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *