State newsराजकीय न्यूज

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या कामांची केली पाहणी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर,दि.31- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रणव परिचारक, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड , मोहन डोंगरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंदिर समितीचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाकडून 73 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर झाला असून, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंदिराच्या सर्वांगीण विकास कामाचा आराखडा पुरातत्व विभागाच्या नामिका सूचीतील वास्तुविशारदाकडून तयार करण्यात आला आहे. आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 27 कोटी 44 लाख निधी मंजूर असून यातील प्रस्तावित कामे सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *