Crime news

धक्कादायक – चक्क शाळाच जमीन म्हणून खरेदी व्यवहार

धक्कादायक – चक्क शाळाच जमीन म्हणून खरेदी व्यवहार

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- चालू असणारी माध्यमिक शाळाच चक्क जमीन म्हणून खरेदी-विक्री दाखवून शासनाचा महसूल बुडवून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.

पंढरपूर तालुक्यातील सुपली या गावात श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक संस्थेची माध्यमिक शाळा,वसतिगृह गावठाण हद्दीत गेली 23 वर्षे सुरू आहे. सदर संस्थेने शिक्षक वर्गणी , ग्रामस्थांच्या मदतीने गट 396/1 मध्ये काही वर्षांपूर्वी नूतन इमारत बांधून शाळा सुरू केली आहे.सदर प्रशालेत शेकडो मुले शिक्षण घेत आहेत.सदर शाळेचा बेकायदेशीर हस्तांतरण वाद शिक्षण मंत्री व उच्च न्यायालयात सुरू असतानाच दि.24 डिसेंबर 2023 रोजी शाळेचे मुख्याध्यापक व बनावट व्यक्तीने संगनमताने स्वतःच्या नातलग, भावाला विक्री केली आहे.सदर जमीन व्यवहार पूर्व तपासणी अहवाल सादर करताना प्रत्यक्ष पाहणी दरम्यान मंडल अधिकारी यांनी पाहणी करताना त्यांना इमारत शाळा दिसत नव्हती का असा सवाल ग्रामस्थ,प्रत्यक्ष सही दिलेले साक्षीदार करीत आहेत.सदर व्यवहार 2 लाख पंचावन्न हजाराचा दाखवून लाखो रुपयांची शाळा इमारत जागा शेत जमीन दाखवून शासनाचा महसूल आर्थिक संगनमताने बुडवल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत तलाठी असणाऱ्या गीता जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता पाहून वरिष्ठांना कळविते असे सांगितले. तर तहसीलदारांना वारंवार फोन करूनही उत्तर देण्याचे टाळले आहे.याबाबत मंडल अधिकारी आणि खरेदी देणारे,घेणारे यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.

ज्ञानदानाचे कार्य चालणारी गरीब मुलांची स्थानिक शाळा विकणारे मुख्याध्यापक, बनावट संस्था मालक व घेणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व बेकायदेशीर शाळा जोडणी रद्द करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सदर व्यवहार रद्द न झाल्यास शाळेतील मुले,पालक व ग्रामस्थ मिळून पंढरपूरचे तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा पळशी सुपली गावच्या पालकांनी इशारा दिला आहे.

बेकायदेशीर शाळा हस्तांतरण,शिक्षक बदल्यातून आर्थिक उलाढाल,शिक्षक पगार खंडणी,मुलांचा पोषण आहार अशा अनेक तक्रारी असलेल्या या शाळेबाबत शिक्षणाधिकरी तृप्ती अंधारे यांनी लक्ष घालून सत्य समोर आणण्याची मागणी पालक- शिक्षक समितीकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *