कोंडी येथे अत्याधुनिक कोव्हीड केयर सेन्टरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

कोंडी येथे अत्याधुनिक कोव्हीड केयर सेन्टरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण Dedication of state-of-the-art Covid Care Center at Kondi by MLA Vijaykumar Deshmukh
   सोलापूर / अनुपम शहा - ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार रुग्ण सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने कोंडी आरोग्य केंद्र येथे साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

 आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी नागरी आरोग्य केंद्र येथे अत्याधुनिक कोव्हीड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. कोंडी गावचे सरपंच सुरेश राठोड,उपसरपंच किसन भोसले,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील कुलकर्णी,डॉ सुनील पत्की,वैद्यकीय अधिकारी संदीप बापट आदींच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. कोंडी ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयात आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतल जाधव, कोंडी नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

    ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांना ऑक्सीजन बेड उपलब्ध न झाल्याने प्राणास मुकावे लागले आहे, यांचा सारासार विचार करून ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या गावातच दर्जेदार व उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण स्थानिक आमदार विकास निधीतून 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून अत्याधुनिक अशा मशिनरी व ऑक्सिजन बेडची सोय या ठिकाणी करून देण्यात आली आहे. स्थानिक विकास निधीतून दिलेल्या साहित्याची निगा चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी राखावी असं आवाहन यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना केले.

     जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतल जाधव यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्याचं कौतुक केलं. आमदार देशमुख आरोग्य मंत्री असताना त्यांनी केलेल्या कार्याला दुजोरा देत नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य लाभण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं.

   कोंडीचे नागरिक संजय पवार यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी गावासाठी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.

  यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कोंडी नागरी आरोग्य केंद्रच्या परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शिवाजी निळ,राजेंद्र भोसले, प्रसाद नीळ, लक्ष्मण साबळे, तुकाराम भोसले,भरत पाटील,  मनोज निंबाळकर,ज्ञानेश्वर वाघमारे,ग्रामसेवक मारुती कांबळे, अंकुश भोसले, बालाजी भोसले, दिलीप राऊत, शंकर राठोड, सुदर्शन माळी, दत्ता भोसले, नामदेव सुतार,ओंकार सुतार यांच्यासह कोंडी गावातील ग्रामस्थ व जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार यांनी केले .आभार प्रदर्शन ग्रामसेवक मारुती कांबळे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: