राजकीय न्यूज

मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विविध विकासकामांसाठी ५ कोटी निधी मंजूर – आ.समाधान आवताडे

मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विविध विकासकामांसाठी ५ कोटी निधी मंजूर – आ.समाधान आवताडे

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ – १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडून विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता मतदारसंघातील कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे ५ कोटीनिधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती. सदर मागणीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून या निधीतून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये सभामंडप बांधणे, तालीम बांधणे,रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी बांधणे,रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे, सामाजिक सभागृह बांधणे,भूमिगत गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे इत्यादी विकास कामे मार्गी लागणार आहेत.

सदर सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार असून नियोजित कामांचा आराखडा तयार करून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच आपल्या गावातील मंजूर कामे सुरळीत व वेळेवर मार्गी लावण्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारण आड न आणता संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे सादर करावीत असे आवाहन जनसंपर्क कार्यालय यांचेकडून करण्यात आले आहे.
मतदार संघात मंजूर झालेल्या पाच कोट रुपये कामांची यादी खालील प्रमाणे

पंढरपूर तालुक्यातील मंजूर कामे व निधी रक्कम-

 तावशी येथील संजय पवार घर ते कॅनॉल रस्ता सुधारणा करणे १० लाख, खर्डी-उंबरगाव रोड ते अशोक पाटील घर रस्ता सुधारणा करणे ९ लाख, रांझणी येथे उमाप घर ते अनपट घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, कासेगाव येथे कालिका नगर ते प्रियंका आवटे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, गादेगाव येथे कोर्टी रोड ते ज्ञानेश्वर पाटील घर उजनी कॅनॉल रस्ता सुधारणा करणे १० लाख, टाकळी येथे महात्मा फुले नगर गटार बांधणे व रस्ता सुधारणा करणे ९ लाख, कोर्टी येथे जांभूळबेट वस्ती ते पारेकर वस्ती कॅनॉल रस्ता सुधारणा करणे ९ लाख, कोर्टी येथे विलास देवाप्पा हाके वस्ती ते टाका वस्ती रस्ता सुधारणा करणे ९ लाख, अनवली येथे जुना अनवली-एकलासपूर भाटघर कॅनॉल ते योगेश ताड घर रस्ता सुधारणा करणे ९ लाख, सिद्धेवाडी येथे विनोद जाधव गुरुजी ते साहेबराव जाधव घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, चिचुंबे येथे चिचुंबे ते कासेगाव रस्ता ते संभाजी घुले घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कासेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचकल वस्ती येथे आर ओ फिल्टर बसविणे ३ लाख, वाखरी येथे ग्रामपंचायत जागेत तालीम बांधणे २८ लाख, शिरढोण येथे भीमा नदी ती स्मशानभूमीपर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, वाखरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागल वस्ती येथे संरक्षक भिंत बांधणे ९ लाख.

मंगळवेढा तालुक्यातील मंजूर कामे व निधी रक्कम-

 अरळी येथे नरसिंह सार्वजनिक वाचनालयास इमारत बांधणे १० लाख, सिद्धापूर ते कुरण वाट पाटील-चौगुले वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, हाजापूर येथे खडकी रस्त्यापासून विठोबा देवकते शेत ते मेटकरवाडी रस्ता सुधारणा करणे ५ लाख, जालीहाळ ते हिवरगाव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, जालीहाळ ते सिद्धनकेरी रोडवर चौगुले वस्तीच्या बाजूला एसटी पिकअप शेड बांधणे ५ लाख, खडकी येथे मरीमाता मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, भाळवणी ते कांबळे वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, बालाजीनगर ग्रामपंचायत कार्यालय शेजारी सभा मंडप बांधणे ५ लाख, हुलजंती येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, सोड्डी ते कोकणगाव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, शिवणगी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख व  महादेव मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसवणे ३ लाख, सलगर खुर्द येथे हनुमान मंदिर ते चांदणी चौक रस्ता सुधारणा करणे ५ लाख, जित्ती येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, कर्जाळ कात्राळ येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, दामाजी नगर येथे मंगळवेढा ते ढवळस रोडवर शिवाजी पार्क अंतर्गत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, दामाजी नगर येथे मंगळवेढा ते दामाजी कारखाना रस्त्यावरून मरुगण पापडीवाले घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, धर्मगाव येथे गुरुनाथ पावले ते गजानन आळगे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, येड्राव-लवंगी रस्ता ते सिद्धनकेरी रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कागष्ट येथे यशवंत मारुती कोळेकर घर ते अंकुश सावंत शेतापर्यंत जाणारा रस्ता सुधारणा करणे ७ लाख, नंदेश्वर येथील बंडू करे वस्ती मधील मंदिरासमोर पत्र्याचे सभा मंडप बांधणे ३ लाख, नंदेश्वर येथे रतिलाल दोलतोडे दुकान ते जनावरांच्या दवाखानापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, नंदेश्वर येथे डीसीसी बँकेसमोरील आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे २ लाख, भोसे ते सिद्धनकेरी रस्ता सुधारणा करणे ७ लाख, भोसे चौगुलेवाडी शाळा ते सुभाष दुधाळ वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ७ लाख, मानेवाडी येथे दरिबा गडदे वस्ती ते हरी मेटकरी वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, रेवेवाडी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, पडोळकरवाडी येथे कोंडीबा पडोळकर घर ते सदा म्हारगुडे घर रस्ता सुधारणा करणे ७ लाख, रड्डे येथे रड्डे- निंबोणी रस्त्यापासून लक्ष्मीदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ७ लाख, शिरनांदगी-रड्डे रोडवरील लक्ष्मी चौक ते भोसे रोडवरील शंभूराजे चौक रस्ता सुधारणा करणे ५ लाख, चिक्कलगी ते कोळे वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, लवंगी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, लक्ष्मी दहिवडी येथे जुगाई मंदिर ते घबाडे विहिरीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ७ लाख, कचरेवाडी रस्त्यापासून मोहिते वस्तीला जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, लोणार ते बुरुंगले वस्ती रस्ता करणे व मोरी बांधणे ८ लाख, शेलेवाडी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, अकोले येथे गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, मरवडे येथे महालिंगराया मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, महमदाबाद(शे) येथे गावअंतर्गत काँक्रिटीकरण करणे ६ लाख, गुंजेगाव हायस्कूल ते रावसाहेब चौगुले वस्ती रस्ता सुधारणा करणे ६ लाख, माचणूर ते भाटे मळापर्यंत रस्ता सुधारणा करणे ७ लाख,मारापुर यादव वाडी ते कोप बंधारापर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, घरनिकी की येथे धनंजय पवार घर ते दावल मलिक पर्यंत जाणारा शिव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, घरनिकी येथे गोरख टाकळे ते धनंजय भुसे वस्ती पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बठाण येथे कारखाना रोड पासून उत्तम बळवंतराव वस्ती ते अरुण धनवडे यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे ५ लाख, देगाव येथील धुळदेव मंदिराला वॉल कंपाउंड करणे ५ लाख, डोंगरगाव-खडकी रस्त्यापासून मोहन हेंबाडे वस्तीपर्यंत जाणारा रस्ता तयार करणे ५ लाख, पाटकळ येथील मोरे-ताड-चव्हाण कोळेकर वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, आंधळगाव-खुपसंगी रस्त्यापासून बिंदू माळी ते खुशाबा पडवळे वस्तीला जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, गोणेवाडी येथे मारुती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे ७ लाख, लेंडवे चिंचाळे आंधळगाव रस्ता ते डिगाआबा वस्तीला जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, शिरसी येथे उमाजी खटकाळे घरापासून शरद गायकवाड वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ४ लाख, केदार वस्ती ते काका गायकवाड वस्ती रस्ता सुधारणा करणे ४ लाख, खोमनाळ ते पटवर्धन तलावाकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, हिवरगाव ते जालीहाळ रस्ता सुधारणा करणे ५ लाख, फटेवाडी येथे गावांतर्गत गटार करणे ५ लाख, डोणज येथे कागष्ट ते डोणज नदाफ वस्ती मार्गे रस्ता करणे ७ लाख, भालेवाडी येथे गाव अंतर्गत काँक्रिटीकरण करणे ५ लाख, बोराळे ते जुना डोणज रस्ता प्रवीण कोरे ते प्रकाश कवचाळे रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बोराळे येथे नवनाथ साळुंखे वस्ती ते भोजने वस्ती रस्ता सुधारणा करणे ३ लाख, दामाजी नगर येथे रियाज मुलाणी घर ते सय्यद वकील घरापर्यंत रस्ता करणे ५ लाख, उचेठाण येथे हरिजन वस्ती ते शिंदे वस्ती रस्ता करणे ७ लाख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *