राजकीय न्यूज

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मावळत्या वर्षात केलेला सहकार्याबद्दल डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मानले आभार

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मावळत्या वर्षात केलेला सहकार्याबद्दल डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मानले आभार

पुणे / डॉ अंकिता शहा – येणारे नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा देत असताना डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी सर्वांच्या हिताची भावना व्यक्त करून ईश्वर चरणी प्रार्थना केली. मावळते वर्ष २०२३ मध्ये विधान परिषदेचे शताब्दी महोत्सव वर्ष असल्यामुळे अनेक कार्यक्रम झाले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच सर्व आमदार आणि विधान परिषदेच्या सर्व कर्मचार्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

पत्रकार, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने दिलेल्या प्रेमाविषयी देखील कृतज्ञता गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित महिलांच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न २०२३ मध्ये सुटला त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या राजकीय इच्छाशक्तीचे देखील आभार मानले.

येणाऱ्या नवीन वर्षात निवडणुका होणार असून सर्वांनी मतदान करावे. देशाला सुरक्षा एकजूट आणि महिलांना सन्मान देणारी आहेत तिच सरकारे राज्यात आणि केंद्रात निवडून द्यावीत अशी इच्छा देखील त्यांनी एक नागरीक म्हणून व्यक्त केली. या वर्षात अनेक अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी जी ताकद प्रदान केली त्यासाठी ईश्वराचे देखील आभार त्यांनी मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *