पंढरपूरात चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

पंढरपूरात चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न Prize giving ceremony of painting and essay competition held in Pandharpur
सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम
  पंढरपूर,(प्रतिनिधी) - भावी पिढीच्या बुध्दीला चालना मिळावी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन पंढरपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पंढरपूरातील विठ्ठल इन येथे नुकताच संपन्न झाला.

    या समारंभास नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले,माजी जि.प.सदस्य व्यंकट भालके, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, युवा नेते रोहन परीचारक, माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, कार्यक्रमाचे आयोजक श्रीनिवास उपळकर, युवक नेते युवराज पाटील, विनोद लटके, स्पर्धेचे परीक्षक उमेश सासवडकर,किरण मोहिते आदी उपस्थित होते.

   कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. आजच्या घडीला त्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीला आणि हाताला काहीतरी वेगळे करण्याचा आनंद भेटला, दररोजच्या त्याच त्या रुटीनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य भरण्याचे कार्य यामुळे झाले, असे प्रतिपादन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक बशीर शेख यांनी केले.सुत्रसंचालन विशाल आर्वे यांनी केले. उपस्थितांचे आभार उमेश वायचळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किशोर काकडे, सोपान (काका) देशमुख, समाधान पोळ, तानाजी गुंजाळ, गणेश भिंगारे, प्रथमेश भिंगारे, पुंडलिक अंकुशराव,सुरज कांबळे,सागर चव्हाण, सारंग दिघे तसेच श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचे सदस्यांनी परीश्रम घेतले अशी माहिती श्रीनिवास उपळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: