General news

पत्रकार संरक्षण समिती च्या पंढरपूर शहराध्यक्षपदी यशवंत कुंभार तर तालुकाध्यक्षपदी संजय हेगडे यांची निवड

पत्रकार संरक्षण समिती च्या पंढरपूर शहराध्यक्षपदी यशवंत कुंभार तर तालुकाध्यक्षपदी संजय हेगडे यांची निवड

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक श्रीकांत कसबे,गौतम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संघटनेच्या पंढरपूर येथील कार्यालयात संपन्न झाली.यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

शहराध्यपदी यशवंत कुंभार,शहर कार्याध्यक्षपदी कबीर देवकुळे ,शहर उपाध्यक्षपदी सचिन दळवी, शहर सचिवपदी मिलींद गायकवाड , तालुकाध्यपदी संजय हेगडे ,तालुका कार्याध्यक्षपदी लक्ष्मण जाधव,तालुका उपाध्यक्षपदी जैनुद्दीन मुलाणी,तालुका सचिवपदी प्रकाश सरताळे , तालुका खजिनदारपदी सुधाकर खरात , शहर व तालुका प्रसिध्दीप्रमुखपदी नागेश काळे आदी नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अशोक गोडगे , नंदकुमार देशपांडे ,उमेश टोमके, डॉ.राजेश फडे, सदस्य शंकर पवार,कल्याण कुलकर्णी , सलीम मणेरी, अमोल कुलकर्णी, अनिल सोनवणे ,अमोल गुरव , शरद कारटकर, सचिन माने ,शंकर कदम,विकी साठे आदी उपस्थित होते.

पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण समिती ही संघटना संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असुन संघटनेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच पत्रकारांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य केले जाते.सर्वसामान्य पत्रकारांना जो विविध माध्यमाद्वारे बातम्या प्रसिध्द करतो, समाजातील विविध प्रश्‍नांवर आवाज उठवतो अशा पत्रकारांना शासकीय मान्यता व शासनाच्या सोईसुविधा मिळण्यासाठी ही संघटना सध्या प्रयत्न करत आहे. आपण सर्वजण आपल्यातील एकी कायम ठेवुन आपल्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न करु असे मनोगत यावेळी बोलताना संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *