टोलनाका – वास्तव गोफणगुंडा
टोलनाका – वास्तव (गोफणगुंडा)
सूर्य उगऊनही अंधार आहे
पावसाळा असूनही सर्वत्र कोरड आहे
लोकशाही असूनही व्यक्तिपूजा आहे
संविधान असूनही भ्रष्टाचार आहे
कायदे असूनही गुन्हेगारी आहे
न्यायालय आहे पण न्याय प्रलम्बीत आहे
शाळा शिक्षक असूनही पोरं निरक्षर आहेत
डोळे असूनही तस्करी जोरात आहे
वारसदार असूनही
आईबाप वृद्धाश्रमांत आहेत
धर्म असूनही धर्मांध शक्तिमान आहेत
दृष्टि असूनही स्वार्थासाठी अंध आहेत
पैश्यासाठी नीती गहाण आहे
माणूस असूनही माणुसकीचा दुष्काळ आहे
तिसरा डोळा :
वाट दाखवणारांच्यापेक्षा
वाट लावणारे अधिक आहेत
सर्वत्र स्वार्थाचा आजार आहे
विश्व म्हणजे मायेचा बाजार आहे
हे पाहून पशूही लाजतो आहे “!!
आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००
