राजकीय न्यूज

जनशक्ती सामाजिक संघटना पंढरपूर तालुकाध्यक्षपदी वाखरी येथील सागर माने यांची निवड

पंढरपूर तालुकाध्यक्षपदी वाखरी येथील सागर माने यांची निवड

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सामाजिक कला क्रिडा सांस्कृतिक अशा आदी क्षेञांमध्ये अग्रेसर असलेल्या जनशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनशक्ती सामाजिक संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी खूपसे-पाटील यांनी येथील सागर माने यांची नियुक्त पञ देऊन निवड केली .

यावेळी सागर माने यांना संघटनेच्या ध्येय धोरणांनुसार सामाजिक कार्य करण्याच्या सुचना देत खूपसे-पाटील यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

सागर माने यांनीही निवडीनंतर संस्थापक अध्यक्ष यांचे आभार मानत सांगितले की संघटनेच्या माध्यमातून मी नेहमी सामाजिक कार्य करून पंढरपूर तालुक्यात संघटना मजबूत करेन.

यावेळी संघटनेचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *