ग्राम संवाद सरपंच संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहिर

ग्राम संवाद सरपंच संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहिर Satish Bhui, West Maharashtra Vice President of Gram Samvad Sarpanch Sangh
पंढरपूर /प्रतिनिधी -  महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या सरपंच संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाने तसेच जिल्हाध्यक्ष सुनील राजमाने व प्रमोद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

 ग्राम संवाद सरपंच संघ हा महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व ग्रामपंचायतपर्यंत पोहोचला असून आजी-माजी सरपंच , उपसरपंच सदस्य यांना कोरोना परिस्थिती असल्याने ऑनलाइन झूम मिटींगद्वारे ग्रामपंचायतमध्ये योजना राबवणे करता येणाऱ्या अडचणी, 15 वित्त आयोग विषयी, तो खर्च करण्यात येणाऱ्या अडचणी गावाचा विकास आराखडा तयार करणे, ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढवणे,विकासात्मक योजना राबवणे,नव बौद्ध व दलित वस्ती सुधार योजनेतून निधी प्राप्त करून घेणे याविषयी सतत ग्राम संवाद सरपंच संघाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण देऊन सर्वांना मार्गदर्शन  व प्रबोधन केले जात आहे. त्याचा लाभ अनेक सरपंच व उपसरपंच घेत आहेत. 

 गाव कोरोना मुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा सरपंच कोमल करपे ताई यांचे नुकतेच अभिनंदन केले आहे. अशा कर्तुत्ववान महिला सरपंचांच वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. गाव कोरणा मुक्त करणे करता त्यांनी केलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी सरपंच उपसरपंच यांनी आपापल्या गावामध्ये केल्यास नक्कीच गाव कोरोना मुक्त होण्यास मदत होईल.ग्राम संवाद सरपंच संघ हा निःपक्षपातीपणे कार्य करत आहे. ही सरपंच संघटना महाराष्ट्र भर पोहचवून वेळोवेळी अडचण येईल तेथे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ला घेऊन एकजुटीने होऊन कार्य करायचे आहे . ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा अशा भावना सतीश भुई  यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: