कुर्डुवाडीतील डॉक्टरांनी केला डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणार्‍या भ्याड हल्ल्यांचा निषेध

कुर्डुवाडीत केला डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणार्‍या भ्याड हल्ल्यांचा निषेध Protests against cowardly attacks on doctors and hospitals in Kurduwadi

कुर्डूवाडी/ राहुल धोका – देशभरात डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणार्‍या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ कुर्डूवाडी येथील आय.एम.ए.कडून निषेध दिन पाळला असून डॉक्टरांनी काळ्या फीती लावून काम केले असल्याची माहिती डॉ. संतोष कुलकर्णी,राज्य अध्यक्ष महाराष्ट्र गर्भलिंग निदान प्रतीबंधित समिती व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आय.एम.ए. यांनी दिली.

राष्ट्रीय स्तरावर निषेध दिन पाळण्यात येत असून याबाबत मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष डॉ. आशिष शहा ,डॉ.चंद्रशेखर साखरे, डॉ.सचिन माढेकर,डॉ.लकी दोशी,डॉ.रोहित बोबडे आदी उपस्थित होते.

 या निवेदनात डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्या साठीचा केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा, जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत येईल सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात ,रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे, हल्लेखोर व्यक्तींवरील खटले जलद न्यायालयात चालवावेत. 

  या मागण्यांबाबत वारंवार आंदोलने करण्यात आले असून देखील केंद्र सरकारने अद्याप कडक कायदा लागू केलेला नाही. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण भारतातील डॉक्टर समूदायाने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम केलेले असतांनाही या काळात रूग्णालयांवर होणारे हल्ले हे मानव जातीला काळीमा फासणारे आहेत असे  निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: