शेतकऱ्याचं लेकरू इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ झाले

शेतकऱ्याचं लेकरू इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ झाले …! The farmer’s son became a scientist in ISRO
 पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील शोभा नंदू माळी यांचा मुलगा सोमनाथ माळी इस्त्रौमध्ये शास्त्रज्ञ झाला.ग्रामीण भागात वाढलेला, १० वी पर्यंत सरकोली येथे शिक्षण घेतलेला सोमनाथ ,घरची परिस्थिती बेताची असताना दोन एकर शेती कुटुंबकबिला चालवण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात काम करत घरची दोन एकर शेती करून वडिलांनी सोमनाथ यांना शिक्षणासाठी पाठबळ दिले. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवस रात्र अभ्यास करून सोमनाथ आपल्या देशातील अंतराळ संशोधन करणाऱ्या इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्त झाला. चारशे ते साडेचारशे मुलांपैकी फक्त सहा मुलं शास्त्रज्ञ म्हणून नियुक्त झाली त्यामध्ये सोमनाथ यांचे नाव आहे.खरं तर ही गोष्ट पंढरपूर तालुक्यासाठी आणि सरकोली आंबे पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद आणि तरुणांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीतला एक कार्यकर्ता या नात्याने शेतकऱ्याच्या लेकरांनी मारलेली गरुडभरारी ही खरंच अभिमानास्पद आहे आणि त्याचं कौतुक हे पहिल्यांदा आपणच केले पाहिजे.या नात्याने आज सोमनाथ यांचा व त्यांच्या शेतकरी कष्टकरी आई-वडिलांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार केला आणि सोमनाथ यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोमनाथ यांनी आपल्या भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी आणि वेगवेगळ्या पोस्टवर जाण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पोरांचे मनोबल वाढवावे अशी इच्छा मी त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली व सोमनाथ यांनी लगेच होकार देऊन आपल्या भागातील तरुणांना भविष्यात काय मार्गदर्शन करत राहील असे आश्वासन दिले असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचीन शिंदे पाटील यांनी सांगितले.

आज सोमनाथ यांच्या आई वडीलांच्या चेहर्यावर जे समाधान आणि आनंदाचे भाव आहेत याची किंमत जगात कोणच करु शकत नाही असेही ते पुढे म्हणाले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाहुबली सावळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: