पत्रकार महेश कदम यांना मातृशोक
पंढरपूर,(प्रतिनिधी) - पंढरपूर पत्रकार संघाचे सदस्य व दैनिक शिवनिर्णय,अस्मिता व्हिजन चे प्रतिनिधी महेश कदम यांच्या मातोश्री विमल मधुकर कदम (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही अस्तित्वात आल्यापासून विमल कदम यांनी मंदिरात छत्तीस वर्ष सेवा केली होती. अध्यात्माकडे त्यांची रुची असल्याने त्यांनी मंदिरात सेवा देण्याचे कार्य केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते .
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Like this:
Like Loading...