राजकीय न्यूज

विविध सामाजिक उपक्रमांनी प्रणव परिचारक यांचा वाढदिवस साजरा

विविध सामाजिक उपक्रमांनी प्रणव परिचारक यांचा वाढदिवस साजरा

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक यांचा वाढदिवस रक्तदान, नेत्र तपासणी, अन्नदान अशा सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमावर समाजातील अपेक्षित वंचित घटकांची सेवा करण्यात आली.

प्रणव परिचारक यांचा वाढदिवस पांडुरंग परिवाराने भारतीय जनता पार्टी , तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंढरपूर शहरात ग्रामीण भागातील विविध ठिकाणी रक्त दान आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रक्तदातांनी रक्तदान केले. या निमित्ताने सर्वसामान्य गरजू रुग्णांना असणाऱ्या रक्ताची गरज आता शमली जाणार आहे. तसेच मागेल त्याला रक्त पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. या शिबिराचे उद्घाटन अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे आणि पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष मस्के सर, माजी नगरसेवक गणेश अधटराव,माजी नगरसेवक विक्रम शिरसट,श्री कसबे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान शिबिराबरोबरच पंढरपूर तालुक्यातील तुंगत आणि मेंढापूर या ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी नेत्र तपासणी केली. यामध्ये शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना पुणे येथे एच व्ही देसाई यांच्यामार्फत मोफत लेन्ससहित शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहेत. या दोन्ही ठिकाणी आसपासच्या गावातील असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यातून मोफत शस्त्रक्रिया होत असणाऱ्या रुग्णांनी प्रणव परिचारक यांच्या बद्दल ऋण व्यक्त केले.

पंढरपूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम, पालवी संस्था, बालकाश्रम , रामकृष्ण वृद्धाश्रम, अंधशाळा , गणेश रुग्ण सेवा मंडळ अशा ठिकाणी मिष्टान भोजन आणि फळे वाटप करून समाजातील दीव्यांग, वंचित बालके आणि वृद्ध व्यक्तींना एक मदतीचा हात देण्यात आला. या कार्यक्रमासाठी पांडुरंग कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी आणि भाजपा यांच्यासह अक्षय वाडकर, तमिम सय्यद, विष्णू सुरवसे, लाला पानकर, संदीप कळसुले, राहुल परचंडे, युवराज मुचलंबे,आबा पवार आदी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या मित्र परिवारांनी पुढाकार घेतला.

लोकांचे प्रेम शुभेच्छांचा वर्षाव आणि क्रेनने सत्कार प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्त दिवसभर परिचारकांच्या वाड्यावर लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. परिचारक यांना प्रत्यक्ष भेटून पुस्तके, पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अक्षय कदम मित्र परिवाराने तर थंडीपासुन बचाव होण्यासाठी गरजूंना ब्लँकेट/चादर वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला.

क्रेनच्या माध्यमातून परिचारक यांना पुष्पहार घालत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर लोकांचे प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *