सरकोली येथील तिघांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल

सरकोली येथील तिघांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल Filed a case of sand theft against three persons from Sarkoli
 पंढरपूर,दि.19/06/2021 - पंढरपूर तालुका पोलीस ठाणे पोकॉ/25 हणुमंत गोरख भराटे यांनी आरोपी पांडूरंग प्रकाश गायकवाड, वय 23 वर्ष, रा.सरकोली,ता.पंढरपुर गाडी मालक,जीवन दत्तात्रय भोसले वय 32 वर्ष, रा सरकोली ता पंढरपुर रॅम्प मालक,सागर माने रा.सरकोली ता. पंढरपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

आज दि. 19/06/2021 रोजी 06/15 वाजण्याचे सुमारास मौजे सरकोली खटकाळी रोडवर माने वस्तीजवळ ता.पंढरपुर येथे टिपर चालक पांडूरंग प्रकाश गायकवाड ,वय 23 वर्ष, रा. सरकोली ता.पंढरपुर टिपर मालक, जीवन दत्तात्रय भोसले, वय 32 वर्ष रा.सरकोली ता.पंढरपुर रॅम्प मालक,सागर माने रा. सरकोली, ता.पंढरपुर यांनी संगनमत करून भिमा नदीचे पात्रातुन जलचर प्राण्यांना उपयुक्त असणारी वाळु शासनाचे परवानगी शिवाय उत्खनन करून चोरून 16 लाख रूपयेचा एक टिपर पुढील बाजुस पांढरा रंग असलेला व पाठिमागे गजगा रंग असलेला पुढे काचेवर शंभुराजे लिहलेले व पाठीमागे दादा लिहलेला व त्याचा नंबर आर.टी.ओ 13 AX 4873 असा असलेला टिपर मध्ये16,000/-रू ची वरील टिपरच्या पाठीमागील हौदामध्ये सुमारे 4 ब्रास वाळू किं अ.चोरून भरून घेवुन जात असताना टिपर चालक पांडूरंग प्रकाश गायकवाड हा वाळुने भरलेले टिपरसह मिळुन आला. म्हणून टिपर चालक पांडूरंग प्रकाश गायकवाड ,जीवन दत्तात्रय भोसले,सागर माने रा.सरकोली ता.पंढरपुर यांचे विरूध्द भादवि कलम 379,34 सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1)4(क)(1) व 21 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद पोकॉ/25 हणुमंत गोरख भराटे ,वय 32वर्ष नेम.पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी दिली आहे .पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर यांचे आदेशाने चालू आहे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: