आंबे येथील चौघांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल

आंबे येथील चौघांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल Filed a case of sand theft against four persons at Ambe
पंढरपूर,19/06/2021- पंढरपुर तालुका पोलीस ठाणे येथे पो.कॉ.पंजाब इंद्रजीत सुर्वे नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपुर यांनी मौजे अनवली ता.पंढरपुर गावचे हद्दीतील घोडके वस्तीजवळ विकास आण्णा गोडसे रा.आंबे ता.पंढरपुर व महेश कोळी रा.आंबे ता. पंढरपूर व भैय्या उत्तम शिंदे रा.आंबे ता.पंढरपूर, बिनु उर्फ शंकर लिंगा भोसले रा.आंबे,ता.पंढरपूर यांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

 दि.19/06/2021 रोजी सकाळी 08/00 वाजण्याचे सुमारास रुपये  3,50,000/-किमतीचा टाटा योध्दा कंपनीचा पिकअप नंबर MH10 AQ 8037 चालक विकास आण्णा गोडसे रा.आंबे ता.पंढरपुर व महेश कोळी रा.आंबे ता.पंढरपूर व दुसरे रुपये  3,00,000/-किमतीचा एक पांढ-या रंगाचा महिंद्रा बोलेरो कंपनीचा पिकअप नंबर MH13 CU 1378 चा चालक भैय्या उत्तम शिंदे रा.आंबे ता. पंढरपूर व बिनु उर्फ शंकर लिंगा भोसले रा.आंबे ता पंढरपुर यांनी आंबे येथील भीमा नदीचे पात्रातुन वाळुचे अवैध्यरित्या उत्खनन करुन शासनाची परवानगी तसेच रॉयल्टी भरलेली नसताना वरील पिकअपचे हौदामध्ये 3000/- रूपये अर्धा ब्रास वाळु भरुन घेवुन जात असताना मिळुन आले आहेत.म्हणून विकास आण्णा गोडसे रा.आंबे ता.पंढरपुर व महेश कोळी रा.आंबे ता. पंढरपूर व भैय्या उत्तम शिंदे रा.आंबे ता.पंढरपूर, बिनु उर्फ शंकर लिंगा भोसले रा.आंबे ता.पंढरपुर  या चार इसमांविरूद्ध भा.दं.वि.कलम379,34सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद आलेने ती दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर यांचे आदेशाने पोहेकॉ ढवळे यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: